‘स्व’प्रतिमामग्न पुरुषाच्या लक्षणांबाबतची काही निरीक्षणे…
सत्ताधाऱ्यांना, विशेषतः हुकूमशहांना या स्व-प्रतिमेची लत लागते. चटक लागते. आणि त्यात ते खुदखुश असतात. त्यांच्या स्व-प्रतिमेचे एक अफलातून व्यसनच असते. त्यांना त्याच अद्भुत रूपांत बघून समाधान पावण्याचे व्यसन गरीब प्रजेलाही लागते. नेता आणि प्रजा दोघांनाही पौगंडाच्या गंडाचे व्यसन लाभते. या व्यसनातून दोघांना बाहेर काढण्यासाठी अजून तरी व्यसनमुक्ती केंद्र निघालेले नाही.......